March 1, 2025 3:04 PM March 1, 2025 3:04 PM
6
देशात आजपासून जन औषधी जन चेतना सप्ताहाला सुरुवात
देशभरात आजपासून जन औषधी जन चेतना सप्ताहाला सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीत प्रधान मंत्री जनऔषधी योजनेच्या रथाला आणि इतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या ७ मार्च रोजी जन औषधी दिवस साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या आठवड्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे, तसंच सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी नागरिकांनीही त्याबद्दल जागृती करावी, असं नड्ड...