April 23, 2025 8:28 PM April 23, 2025 8:28 PM

views 14

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू

या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल.    मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबा...

April 23, 2025 3:48 PM April 23, 2025 3:48 PM

views 14

पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राज्यात परत आणण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.    डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने, पुण्याचे कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे द...

April 23, 2025 3:34 PM April 23, 2025 3:34 PM

views 10

काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था

पहलगाम इथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान उड्डाणं आयोजित करण्याविषयी चर्चा केली. नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली.   विमान कंपन्यांना नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही नायडू यांनी विमान कंप...

April 23, 2025 1:33 PM April 23, 2025 1:33 PM

views 12

दहशतवादाच्या विरोधात साऱ्या जगाचा भारताला पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जगभरातल्या नेत्यांनी तीव्र निषेध करत, भारताला पाठिंबा दर्शवला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधातल्या लढाईत अमेरिका भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला.   ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टारमर यांनी हा विनाशकारी असल्याचं म्हणत, हल्ल्यातले पीडित आणि भारतीय नागरिकांसोबत सहेवेदना व्यक्त केल्या आहेत...

November 2, 2024 8:37 PM November 2, 2024 8:37 PM

views 6

कश्मीर खोऱ्यात अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.    श्रीनगर शहराच्या खान्यार परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असताना, दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. उस्मान ऊर्फ छोटा वलीद असं मारल्या गेलेल्या दशतदवाद्याचं नाव असून, तो बराच काळ सक्रिय होता आणि काश्मीर खोऱ्यातल्या अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्दी यांनी दिली. या कारवाईत जम्मू -काश्मीर पोलिसांचे दोन आणि केंद्रीय ...