October 2, 2024 1:39 PM

views 17

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांमधे एकूण ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं होतं तर २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झालं होतं. हरियाणामध्ये येत्या शनिवारी एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. हरियाणात पलवल इथं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झा...

September 28, 2024 1:42 PM

views 17

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं प्रचारसभेत बोलत होते. या निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरच्या ४० मतदार संघांमध्ये येत्या मंगळवारी मतदान होणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही  प्रचारसभा आज जम्मू इथं होणार आहे.   दरम्यान, केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूका शांततेत पार पडत असल्या...

September 26, 2024 2:07 PM

views 12

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ५७ टक्के मतदान झालं. सहा जिल्ह्यातल्या २६ मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं. श्री माता वैष्णो देवी मतदारसंघात सर्वाधिक ८० पूर्णांक ७४ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली, तर सुर्णकोट मध्ये ७४ पूर्णांक ९५ शतांश आणि पूँछ हवेली मध्ये ७४ पूर्णांक ६६ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी समाधान व्यक्त केलं. केंद्रशासित प्रदेशातल्या नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वा...

September 19, 2024 6:12 PM

views 18

काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवादाची भीती न बाळगता मतदान झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीर मध्ये सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू असून पहिल्यांदाच दहशतवादाची भिती न बाळगता मतदान झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज श्रीनगरमधल्या प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्रशासीत प्रदेशात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जम्मू काश्मीरची जनता देशाच्या लोकशाहीला बळकट करत आहे, असंही ते म्हणाले.     प्रधानमंत्री संध्याकाळी कतरा आणि ...

September 19, 2024 1:02 PM

views 19

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६१ टक्के मतदानाची नोंद

  जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३५ वर्षातल्या सर्वाधिक ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व २४ मतदारसंघात काल शांततेत मतदान झालं. किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली आणि पुलवामामध्ये सर्वात कमी सुमारे ४७ टक्के मतदान झालं.   युवा आणि महिला मतदार मोठ्या संख्येनं या मतदानात सहभागी झाले होते. बहिष्कार आणि दहशतवादाला मतदारांनी मतदान यंत्रातून उत्तर दिल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी निवडणूक प्रक्रियेतल्या य...

September 16, 2024 1:23 PM

views 19

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तिन्ही टप्प्यांची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.   जम्मू काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल हरियाणा विधानसभा निकालाबरोबर ८ ऑक्टोबर रोजी घोषित होईल.

September 6, 2024 12:20 PM

views 13

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून ४० स्टार प्रचारकांची नावं जाहीर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने काल 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली. यात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी. किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराजसिंह चौहान हे देखील प्रचाराची धुरा सांभाळतील. 90 सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि ...

August 27, 2024 1:33 PM

views 19

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूंछ इथून सुरणकोट, मेंढार आणि हवेली विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

August 26, 2024 8:40 PM

views 18

जम्मू-कश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाची सोळा उमेदवारांची यादी जाहीर

जम्मू काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने आज सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. ९० जागांसाठी होणाऱ्या या  निवडणुकीकरता भाजपानं याआधी ४४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती मात्र ती नंतर मागं घेतली. या निवडणुका येत्या १८ सप्टेंबरपासून तीन टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी ४ ऑक्टोबरला होईल.