December 26, 2024 3:17 PM December 26, 2024 3:17 PM

views 5

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद महाराष्ट्रतल्या २ जवानांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या कामेरी इथले तर, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथले रहिवासी आहेत.  

November 4, 2024 11:02 AM November 4, 2024 11:02 AM

views 13

जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठीच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज बैठक होणार

जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठीच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज बैठक होणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल रहीम राथेर यांचे नाव यासाठी प्रस्तावित करण्यात आलं आहे. विधानसभा सचिवालयाच्या कामकाजानुसार सकाळी 10.30 वाजता सभागृहाची बैठक होणार आहे.   नॅशनल कॉन्फरन्सकडे 41 आमदार असून 90 सदस्यांच्या विधानसभेत मित्रपक्ष काँग्रेसचे 6 आणि सीपीआय-एमकडे एक आमदार असल्याने ही निवड सोपी होण्याची शक्यता आहे. नॅशनल कॉन्फरन्सने उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडे विचारणा केली आहे. भाजपने नरेंद्र...

November 3, 2024 6:36 PM November 3, 2024 6:36 PM

views 6

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर स्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर रविवारच्या बाजारात झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात किमान १० नागरिक जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार टीआरसी क्रॉसिंग भागात दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या वाहनांच्या दिशेनं एक ग्रेनेड फेकला, मात्र त्यांचा नेम चुकल्यानं तो रस्त्यावर फुटला. पोलिसांनी या भागात नाकेबंदी करून आरोपींना शोधण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस महासंचालक नलीन प्रभात आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या हल्ल्याबाबत चर्चा केली ...