January 10, 2026 6:30 PM January 10, 2026 6:30 PM
9
J&K नियंत्रण रेषेजवळच्या गावात संशयास्पद कबुतर पकडलं
जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या गावातल्या एका मुलाने आज सकाळी एक संशयास्पद कबुतर पकडलं. राखाडी रंगाच्या या कबुतराच्या दोन्ही पंखांवर काळ्या रंगाच्या पट्ट्या, आणि शिक्का आहे. पायात लाल आणि पिवळ्या रंगाच्या कड्या असून, त्यावर ‘रेहमत सरकार' आणि 'रिजवान २०२५' ही अक्षरं आणि त्यानंतर विशिष्ट संख्या कोरली आहे. हे कबुतर पुढल्या तपासासाठी पल्लनवाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.