November 15, 2025 1:49 PM
40
जम्मू काश्मीरमध्ये नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, ९ जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री स्फोटकांचा अपघाती स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या स्फोटात २७ पोलीस, दोन महसूल अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणाच्या फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी सुरू असताना काल रात्री उशीरा हा स्फोट झाला. ही स्फोटकं पोलीस ठाण्याच्या परिसरात मोकळ्या जागेत सुरक्षित ठेवण्यात आली...