September 18, 2024 8:05 PM September 18, 2024 8:05 PM
16
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८ पूर्णांक १९ शतांश टक्के मतदान झालं आहे. पहिल्या टप्प्यातल्या २४ विधानसभा मतदारसंघांत सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काश्मीरमधल्या १६ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ६७ पूर्णांक ८६ शतांश इतकी टक्केवारी पहलगाम इथं नोंदवली गेली. त्राल विभागात सर्वात कमी म्हणजे ४० पूर्णांक ५८ शतांश टक्के इतकं मतदान झालं. जम्मू विभागात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८ मतदारसंघांपैकी किश्तवाड जिल्ह्यातल्या इंदरव...