September 7, 2025 11:25 AM September 7, 2025 11:25 AM

views 27

भूस्खलन ग्रस्त भागात हवाई दलाची जवळपास ६ टन जीवरक्षक खाद्यपुरवठा करण्याची धाडसी मोहिम

जम्मू आणि काश्मीर तसंच हिमाचल प्रदेशातील भूस्खलन ग्रस्त भागात एक मोठी मानवतवादी मोहीम राबवली आहे. हवाई दलानं समाज माध्यमांवरून एक संदेश प्रसारित केला असून, त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर या भूस्खलनग्रस्त भागात हवाई दलानं जवळपास ६ टन जीवरक्षक खाद्यपुरवठा करण्याची धाडसी मोहिम राबवली आहे. हिमाचल प्रदेशात राबवण्यात आलेल्या १७ तासांच्या मोहिमेमध्ये पाचशे चाळीस लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं नमूद केलं आहे. या मोहिमांसाठी चार हेलिकॉप्टर आणि ३५ कर्मचारी दिवसरात्र राब...

August 14, 2025 8:17 PM August 14, 2025 8:17 PM

views 15

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे २३ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यातल्या चसोटी इथं झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसात २३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर इथली मच्छेल माता यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या इथं तैनात करण्यात आल्या असून मदत आणि बचावकार्य सुमारे २० दिवस चालेल, असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौ...

August 3, 2025 7:56 PM August 3, 2025 7:56 PM

views 5

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरुच

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु आहे. यादरम्यान दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत. शुक्रवारी रात्री ८ वाजता देवसरमधे अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर लष्कराच्या ९ राष्ट्रीय रायफल्सनं जम्मू-काश्मीर पोलीस आणि  सीआरपीएफ जवानांसह शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्यानं दिली आहे. दहशतवादी लपल्याची शक्य...

May 30, 2025 12:48 PM May 30, 2025 12:48 PM

views 7

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री जम्मूमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. येत्या ३ जुलैपासून सुरू होत असलेल्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचाही शाह यांनी या बैठकीत आढावा घेतला. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. शहा यांचं दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यासाठी काल जम्मूमध्ये आगमन झालं. ते आज पूंछला भेट देणार असून तिथं पाकिस्तानच्या गोळीबारामुळे नुकसान झाले...

May 16, 2025 3:39 PM May 16, 2025 3:39 PM

views 13

जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत ६ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांत सुरक्षा दलांच्या दोन संयुक्त मोहिमांमधे सहा दहशतवादी ठार झाले.  भारतीय लष्कर , केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी श्रीनगर इथे घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. दोन्ही मोहिमा ४८ तासांत यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून त्यात आपल्या सुरक्षा दलांची जीवितहानी झाली नसल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. सर्व सुरक्षादलांमधला समन्वय आणि स्थानिक नागरिकांचं सहकार्य या मोहिमेत महत्वाचं ठरलं  असंही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

May 13, 2025 1:31 PM May 13, 2025 1:31 PM

views 9

जम्मूकाश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या शुकरू केल्लर वन विभागात संरक्षण दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी लष्कर ए तैयबा किंवा द रेझिस्टन्स फ्रंट चे सदस्य असल्याची शक्यता काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिर्दी यांनी वर्तवली आहे.    या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने शोध मोहीम सुरू केली होती. संरक्षण दलाचे जवान संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाल...

May 13, 2025 10:26 AM May 13, 2025 10:26 AM

views 9

जम्मूकाश्मीरमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू

जम्मू आणि काश्मीर सरकारनं जम्मू तसंच काश्मीर विभागाच्या काही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री सकीना इटू यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. सीमाभागातील शैक्षणिक संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

April 23, 2025 7:29 PM April 23, 2025 7:29 PM

views 10

पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सार्वत्रिक निषेध

जम्मू काश्मीरमधे पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून काश्मीरमधे अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी  शासन सज्ज असल्याचं म्हटलं आहे. राज्यातल्या विविध राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.    मुंबईत शहर भाजपनं कांदिवली इथं  भारतीय जनता पक्षानं दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. या ...

March 23, 2025 11:06 AM March 23, 2025 11:06 AM

views 8

जम्मू-काश्मीरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं आयोजन

जम्मू-काश्मीरमध्ये, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज जम्मूच्या अभिनव थिएटरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. चित्रपट निर्माते, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी जम्मू काश्मीर सिने असोसिएशननं हा लघुपट महोत्सव आयोजित केला आहे. उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देण्याबरोबरच सिनेमाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार या निमित्ताने होणार आहे.

January 20, 2025 1:30 PM January 20, 2025 1:30 PM

views 9

जम्मूकाश्मीर : ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकारची मंत्रिमंडळ बैठक

जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज जम्मूत नागरी सचिवालय इथं होणार आहे. या बैठकीत अर्थ, आरोग्य आणि शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात सुधारणा, दंत महाविद्यालयांत त्रिस्तरीय फॅकल्टी स्ट्रक्चर लागू करणं आणि झेलम, बाणगंगा नद्यांच्या संवर्धनासारख्या पर्यावरणविषयक विषयांवर चर्चा होणार आहे.