September 23, 2024 8:13 PM

views 31

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली.  जम्मू काश्मीरमध्ये २५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. यात २५ लाखांहून अधिक मतदार २३९ उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या सहा जिल्ह्यातल्या २६ विधानसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार आहे.  दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगरमध्ये प्रचारसभांना संबोधित केलं. नॅशनल कॉन्फरन्स -...