September 16, 2024 7:55 PM September 16, 2024 7:55 PM
7
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी स्थानिक प्रशासन सज्ज होत आहे. जम्मू काश्मीरमधे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोल यांनी मतदारांसाठी विशेष जागृती अभियान सुरु केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्वीप कार्यक्रम येत्या १८ सप्टेंबरपासून पूर्ण केंद्रशासित प्रदेशात राबवला जाणार आहे. या जागृती अभियानात मतदार मतदान करण्याची शपथ घेणार असून त्यांना मतदान प्रतिबद्धतेचं प्रमाणपत्र दिलं जाईल. जम्मू काश्मीरमधे येत्या १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्य...