April 23, 2025 8:14 PM

views 15

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

April 7, 2025 9:44 AM

views 19

केंद्रीय मंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी जम्मू इथं आगमन झालं. ते आज कठूआ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. तसंच, ते विनय या आंतरराष्ट्रीय हद्दीलागत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाक्याला भेट देणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमधील राज भवन इथं हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतील. कठूआ इथं 23 मार्च रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार पोलिसांना मरण आलं होतं. आज दुपारी ते श्रीनगरकडे रवाना होतील. तिथे ते उद्या जम्मू आणि काश्मीरमधील विकास ...

March 14, 2025 11:02 AM

views 22

जम्मूकाश्मीर आणि लडाखमध्ये अर्थसंकल्पाच्या पारदर्शक वितरणासाठी समितीची स्थापना

जम्मूकाश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचनेनंतर मालमत्ता, दायित्वे आणि अर्थसंकल्पाचं पारदर्शक वितरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल जम्मू काश्मीर विधानसभेत दिली. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अब्दुल्ला बोलत होते. ही प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2020 च्या अधिसूचनेनुसार केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. समितीच्या बहुतेक शिफारशी आधीच लागू करण्यात आल्या असून सार्वजनिक कर्जाच्या वाटणीबाबत 2 हजार 504 कोटी रुपयांचं आ...

March 10, 2025 10:55 AM

views 15

Jammu-Kashmir : एकाच कुटुंबातील तीघांचे मृतदेह सापडल्याप्रकरणी कसून चौकशी

जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ३ जणांचे मृतदेह सापडले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीसांकडून एका दलाची स्थापना करण्यात आली असून या प्रकणाचा कसून तपास करण्यात येईल अशी ग्वाही जम्मू कथुआ सांबा भागाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवकुमार यांनी दिली. ५ मार्च रोजी एका लग्न समारंभातून ३ जण बेपत्ता झाले होते, त्यांचे मृतदेह मलहार भागातील इशू नालानजिक आढळून आले आहेत. कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना आणि सैन्य अधिकाऱ्यांचे सहायक विनय खोसला यांच्यासमवेत, पोलिस उपमहानिरीक्षक यांनी बि...

March 6, 2025 1:33 PM

views 17

जम्मू-काश्मीर विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल २०२५ सादर

जम्मू-काश्मीर विधानसभेत अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज आर्थिक पाहणी अहवाल २०२५ सादर केला. जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था ७ पूर्णांक ६ शतांश टक्के दरानं वाढेल तर सकल राज्य देशांतर्गत उत्पादनात ११ पूर्णांक १९ शतांश टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बेरोजगारीचा दर २०१९-२० च्या ६ पूर्णांक ७ शतांश टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये ६ पूर्णांक १ शतांश टक्क्यांवर आला आहे.   जम्मू-काश्मीरमध्ये काल मंत्रिमंडळानं कामकाज नियमावलीला मंजुरी दिली. ती आता पुढच्या मंजुर...

January 5, 2025 1:55 PM

views 27

जम्मू काश्मीरमधे वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू, दोघं बेपत्ता

जम्मू काश्मीरमधे किश्तवाड जिल्ह्यात ग्वार मासू परिसरात एका वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत. घाटातल्या रस्त्यावरुन घसरुन हे वाहन खोल दरीतल्या नदीत कोसळलं. किश्तवाड पोलिसांनी मदतकार्य सुरु केलं आहे. किश्तवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. 

January 2, 2025 8:15 PM

views 12

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

December 3, 2024 8:32 PM

views 16

जम्मू आणि काश्मीरमध्ये चकमकीत कुख्यात दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाचिगाम जंगलात झालेल्या चकमकीत जुनैद अहमद भट हा कुख्यात दहशतवादी ठार झाला. दाचिगाम भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल मध्यरात्री शोध मोहीम राबवली. त्यावेळी सुरक्षा दलांचा सुगावा लागलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. भट हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर असून २० ऑक्टोबर रोजी गंदरबल जिल्ह्यात बोगदा बांधकामाजवळ झालेल्या स्फोटात त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांच्या अधिकृत सूत्रा...

November 10, 2024 7:47 PM

views 18

जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कनिष्ठ अधिकारी शहीद, तीन जवान जखमी

जम्मू-कश्मीरमधे किश्तवार जिल्ह्याच्या दुर्गम जंगल भागात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कनिष्ठ अधिकारी शहीद झाला, तर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर संयुक्त शोधमोहिम करणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. शोधमोहिम अजूनही सुरु आहे.

October 28, 2024 8:07 PM

views 9

जम्मूच्या अखनूर विभागात लष्कराच्या विशेष दलांनी राबवलेल्या मोहिमेत  एक दहशतवादी ठार

जम्मूच्या अखनूर विभागात बत्तल गावात लष्करी ॲम्ब्युलन्सवर आज सकाळी गोळीबार करणाऱ्या घुसखोरांच्या गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी लष्कराच्या विशेष दलांनी राबवलेल्या मोहिमेत  तीन पैकी एक दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडून हत्यारं जप्त करण्यात आली.