August 18, 2025 1:21 PM August 18, 2025 1:21 PM
4
जम्मू आणि काश्मिरमधील जिल्ह्यात पूर येण्याचा इशारा
जम्मू आणि काश्मिरमधील अनेक जिल्ह्यांत पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जम्मू, रेसई, उधमपूर, राजौरी, पूँछ, सांबा आणि कथुआ इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दोडा, किश्तवाड, रामबन इथं मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू इथली सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळा बंद ठेवल्या आहेत. पर्यटकांना ही सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.