September 29, 2024 1:46 PM September 29, 2024 1:46 PM
8
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपणार
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात येत्या १ ऑक्टोबरला एकूण ४० मतदारसंघात मतदान होईल. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात ६१ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ५६ टक्के मतदारांनी मतदान केलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जननायक जनता पार्टी आणि आझाद समाज पार्टी यांच्या आघाडीनं शिरसा इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यातल्या सर्व पिकांना किमान हमी भाव, पीक संरक्षण योजना, शेतकरी आणि बेरोजगार युवकांना दरमहा ११ हजार रुपये अर्थसहाय्य, एक ला...