June 20, 2024 8:10 PM

views 21

चांगल्या कामगिरीच्या आधारेच जनतेनं सलग तिसऱ्यांदा निवडून दिलं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आपलं सरकार चांगली कामगिरी करून दाखवतं या कामगिरीच्या आधारेच आपल्याला देशातल्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधे सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतरची त्यांची ही पहिली जाहीरसभा होती.   आगामी काळात जम्मू कश्मीर एक राज्य म्हणून आपलं भविष्य घडवेल, या राज्यानं जो विकासाचा मार्ग निवडला आहे, तो मार्ग आपण अधिक उत्तम करणार आहोत., असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     प्रधानमंत्री जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते...

June 17, 2024 2:25 PM

views 42

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला.   जम्मू-काश्मीरमधला दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. दहशतवाद आता नियंत्रणात असून संघटित हिंसक दहशती कृत्यांऐवजी छुप्या संघर्षाचं रूप त्याला प...

June 16, 2024 2:41 PM

views 30

जम्मू – काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला या बैठकीला उपस्थित आहेत. गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपें...

June 13, 2024 8:41 PM

views 40

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी

जम्मू काश्मीर मधल्या दोडा जिल्ह्यातल्या गंडोहच्या कोटा टॉप भागात  सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. काल रात्री झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.