December 19, 2024 3:07 PM

views 13

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत पाच दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या मोहिमेत भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुलगाम जिल्ह्यातल्या कादर या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्रीपासून या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. या दरम्यान ही चकमक सुरू झाली होती, अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.    जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या...

December 15, 2024 1:54 PM

views 13

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातील आरोपी हकमखान याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

जम्मू-काश्मीरमधल्या शिव खोरी, रानसू इथून यात्रेकरूंना कटरा इथं घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातला आरोपी हकमखान याच्याविरुद्ध एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल आरोपपत्र दाखल केलं. गेल्या ९ जून रोजी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ यात्रेकरू तसेच बस चालक ठार झाला होता तर ४१ यात्रेकरू गंभीर जखमी झाले होते. गोळीबारामुळे बस चालकाच्या डोक्याला गोळी लागल्यानं त्याचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस एका खोल दरीत कोसळल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

December 12, 2024 2:38 PM

views 19

जम्मू काश्मीर मधला वार्षिक सांस्कृतिक आणि कला उत्सव सोनजल २०२४ ला आजपासून सुरुवात

जम्मू काश्मीर मधला वार्षिक सांस्कृतिक आणि कला उत्सव सोनजल २०२४ आजपासून सुरु होत आहे. श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठात होणारा हा महोत्सव ९ दिवस चालणार आहे. या उत्सवात जम्मू काश्मीरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचं प्रदर्शन होत असतं.

November 27, 2024 1:23 PM

views 9

जम्मूकाश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर पोलिसांची छापेमारी

जम्मू काश्मिरमधल्या रजौरी, पूँछ, किश्तवर आणि उधमपूर जिल्ह्यातल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर पोलिसांनी काल रात्री छापेमारी केली. यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक सामान, कागदपत्र, रोख रक्कम, शस्त्र आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई सुरू राहणार असल्याचं जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितलं. कुठलीही संशयित हालचाल आढळून आल्यास नागरिकांनी याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन  त्यांनी केलं आहे.

November 8, 2024 11:06 AM

views 14

काश्मिरच्या सोपोर भागात हशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मिरच्या सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. लष्कराकडून आलेल्या अधिकृत बातमीनुसार, सोपोरच्या पाणिपोरा परिसरात दहशतवाद्याचा गट लपला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या संयुक्त शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. गेल्या अठ्ठेचाळीस तासात, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे.

November 8, 2024 10:46 AM

views 8

ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांची जम्मू आणि काश्मिरंमध्ये हत्या

जम्मू आणि काश्मिर खोऱ्यातल्या किश्तवर जिल्ह्यात काल ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेऊन हत्या केली. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावं आहेत.   जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी हत्येचा निषेध केला आहे. जम्मू आणि काश्मिरचे नायब राज्यपाल लेफ्टनंट मनोज सिन्हा यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

October 21, 2024 3:45 PM

views 23

जम्मू-काश्मीरमध्ये एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या

जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात गगनगीर इथं दहशतवाद्यांनी एक काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नईदगाम इथले रहिवासी होते. गेल्या तीन दिवसांतील मजुरांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए या प्रकारणाची चौकशी करीत आहे.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...

October 18, 2024 7:50 PM

views 9

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी आज पुंछ जिल्ह्यात दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताकडून चार ग्रेनेड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूंछ शहर आणि सुरनकोट शहरात झालेल्या दोन ते तीन ग्रेनेड हल्ल्यांशी या व्यक्तीचा संबंध असल्याचा पुंछ पोलिसांना संशय आहे. हल्ल्यानंतर या भागात सुरक्षा उपाय आणि शोधमोहीम वाढवण्यात आली आहे. संशयिताच्या अटकेमुळे  हल्ल्यांशी आणखी दहशतवादी संबंधाचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे.

October 16, 2024 8:32 PM

views 23

जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे ओमर अब्दुल्ला यांचा शपथविधी

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून  नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज शपथ घेतली. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अब्दुल्ला यांच्याबरोबर आणखी ५ मंत्र्यांचाही शपथविधी यावेळी झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तसंच इंडीया आघा...