March 3, 2025 9:46 AM

views 15

जम्मू-काश्मीर विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभेचे महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज जम्मूमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अभिभाषणाने सुरू होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलंच अधिवेशन आहे. २०१८ मध्ये पीडीपी आणि भाजपा युतू सरकारच्या कार्यकाळांत अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ओमर अब्दुल्ला येत्या ७ तारखेला अर्थसंकल्प सादर करतील.

February 25, 2025 9:51 AM

views 20

जम्मू-काश्मीरमधल्या युवा पिढीशी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संवाद

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या युवा पिढीशी संवाद साधला. जम्मू आणि काश्मीरमधले २५० महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी नवी दिल्लीत आले आहेत. कलम ३७० रद्द करुन केंद्र सरकारनं देश एकसंध केला असून आता जम्मू काश्मीरमधल्या जनतेला देशातल्या अन्य राज्यांमधल्या नागरिकांप्रमाणेच सगळे अधिकार मिळतील असं शहा म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी शांतता, सलोखा आणि विकासाबा...

February 18, 2025 12:55 PM

views 17

जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधे नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. त्यांच्याशिवाय इतर उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शहा यांनी याआधी उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि गुजरातमधे फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता.

February 13, 2025 1:11 PM

views 23

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. कृष्णा घाटी सेक्टरमध्येही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून या भागात भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. गेल्या आठवडाभरात सीमेपलीकडून वाढत असलेल्या कारवायांमुळे नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं.

January 20, 2025 8:00 PM

views 17

जम्मू काश्मीरमधे दहशतवादविरोधी कारवाईत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी

जम्मू काश्मीरमधे बारामुल्ला जिल्ह्यात जालोरा गुज्जरपती सोपोर जंगलपरिसरात दहशतवादविरोधी कारवाईत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. आज दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलानं मोहीम तीव्र केली असून संपूर्ण परीसराला घेराव घातला आहे.

January 20, 2025 9:52 AM

views 14

जम्मूकाश्मीर : उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकच्या कटरा-बडगाम विभागाची अंतिम चाचणी पूर्ण

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकच्या कटरा-बडगाम विभागाची अंतिम चाचणी काल पूर्ण झाली. कटरा रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजता 18 डब्यांची चाचणी रेल्वेगाडी काश्मीरसाठी रवाना झाली. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला हा रेल्वे जोडमार्ग 41 हजार कोटी रुपये पूर्ण करण्यात आला. 326 किलोमीटर लांबीच्या कटरा ते बडगाम मार्गापैकी 111 किलोमीटरचा मार्ग बोगद्यांमधून जातो. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पूल रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधला आहे. एक हजार तीनशे 15 मीटर लांबीचा हा पूल नदी...

January 16, 2025 8:40 PM

views 17

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या बंधल गावात गेल्या महिन्यात झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार आहे. यासाठी ११ जणांची विशेष  तपास  समिती नेमण्यात आली आहे. राजौरीच्या पोलिस महासंचालकांनी ही घोषणा केली आहे. मृतांच्या अवशेषामध्ये न्युरोटोक्सिक घटक आढळले असून त्याची सखोल तपासणी करून मृत्यूची कारणं शोधली जाणार आहेत. या तपासपथकात न्यायवैद्यक, टोक्सिकोलॉजी, बालरोग तज्ञ आणि सुक्ष्मजीव शास्त्र तसचं रोग निदान तज्ञांचा समावेश आहे.  बंधल गावात गेल्या महिन्यात अज्ञात आजारामुळे केवळ एका मह...

January 13, 2025 3:49 PM

views 16

श्रीनगर – सोनमर्ग रस्त्यावरच्या बोगद्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जम्मू काश्मीर मधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान बारमाही रस्ता उपलब्ध होईल. सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या सोनमर्ग बोगदा प्रकल्पासाठी २ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून हा बोगदा भूस्खलन आणि हिमस्खलनप्रवण रस्ते टाळून लडाखशी अखंड संपर्क निर्माण करणार आहे. यामुळे सोनमर्ग इथं हिवाळी पर्यटन, साहसी खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. तसंच श्रीनगर आणि लडाख दरम्यान प्रवासाच्या वे...

January 4, 2025 8:13 PM

views 22

जम्मू काश्मीरमध्ये येत्या सोमवारपर्यंत जोरदार हिमवृष्टी-हवामान विभाग

जम्मू काश्मीर मध्ये आज पासून येत्या सोमवार पर्यंत जोरदार हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू मध्ये पुढील काही दिवस सकाळच्या वेळात धुक्याचं साम्राज्य असेल तर दिवसा हवामान ढगाळ राहील.  काश्मीरमध्ये ५ आणि ६ तारखेला थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागानं यल्लो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान धक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं श्रीनगर विमानतळावरील विमानसेवा विलंबाने सुरु आहे.

January 3, 2025 10:27 AM

views 16

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले. धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक ...