April 27, 2025 8:28 PM

views 21

जम्मू काश्मीरमधे बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांंना अटक

जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात पोलिसांनी आज दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांंना अटक केली. ताहीर अहमद कुमार आणि शबीर अहमद गनई अशी त्यांची नावं आहेत. हे दोघं दहशतवाद्यांना आश्रय देणं, रसद पुरवणं, तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्ती करणं आदी कारवायांमधे सामील होतं ,असं पोलिसांनी सांगितलं.

April 27, 2025 1:29 PM

views 13

जम्मू-काश्मिर विधानसभेचं सोमवारी विशेष अधिवेशन

जम्मू - काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यु झाला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल, त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल, आणि या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या...

April 26, 2025 12:44 PM

views 14

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री काश्मीर भागात शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं. याला भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   या चकमकींमध्ये भारतात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास विविध यंत्रणा करत आहेत. संपूर्ण काश्मीर जिल्ह्यात शोधमोहिमा राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं विशेष पथकही तपासकार्यात गुंतलं आहे.

April 23, 2025 10:39 AM

views 28

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह २ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अद्याप ओळख पटवण्याचं आणि बचावकार्य सुरू असल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा स्पष्ट नसल्याचं सुरक्षा दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.   दरम्यान, या भ्याड ह...

April 22, 2025 6:26 PM

views 34

जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथे पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.   या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी केली असून शोधमोहीम सुरू आहे.

April 12, 2025 2:36 PM

views 17

दहशतवाद्यांच्या नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला

जम्मू काश्मीरच्या अखनूर विभागात दहशतवाद्यांच्या समूहाचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला. अखनूरमधे केरी भट्टल परिसरात काल रात्री काही सशस्त्र दहशतवाद्यांची हालचाल लष्करानं टिपली, आणि त्यांना शरण यायला सांगितलं.   त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचा कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी शहीद झाला. या प्रकारानंतर संबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवण्यात आला असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

April 2, 2025 2:54 PM

views 19

जम्मू आणि काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात अजूनही शोध मोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात आणि बिलावरच्या पर्वतीय भागात सुरक्षा दलांनी सलग दुसऱ्या दिवशीही आपली शोध मोहीम सुरू ठेवली आहे.   काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल या भागाला भेट दिली आणि शोध मोहीमेचा आढावा घेतला.

April 2, 2025 1:16 PM

views 25

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ नव्या फौजदारी कायद्यांची संपूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं समित्या स्थापन केल्या आहेत. केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक सुकाणू समिती आणि पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक अधिकार प्राप्त समिती स्थापन केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. 

March 21, 2025 8:16 PM

views 31

एनडीए सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमधे दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट

राज्यसभेत आज गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण बाळगणारं आहे, त्यामुळेच एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७० टक्क्यानं घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी सांगितलं.   या क्षेत्रातल्या दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट झाल्याचं ते म्हणाले. यावेळी शहा यांनी देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी बलिदान देणाऱ्या राज्य...

March 21, 2025 1:31 PM

views 24

जम्मूकाश्मीरमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक घरांचं नुकसान

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात लागलेल्या भीषण आगीत २० पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून ३७ कुटुंबे बेघर झाली आहेत. दक्षिण काश्मीरमधल्या कादिपोरा भागातल्या गाजीनाग इथं एका घरात आग लागली आणि ती आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली. दाट लोकवस्ती असलेल्या भागात आगीदरम्यान काही गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे आग आणखी वेगाने पसरली. पोलीस, सुरक्षा दलं आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसरातल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.