October 7, 2024 8:34 PM October 7, 2024 8:34 PM
15
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मिरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळे यांनी सांगितलं. स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रुमवरल्या सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस उपअधिक्षक देखर...