August 27, 2025 8:09 PM August 27, 2025 8:09 PM

views 8

वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.   जम्मूमध्ये २४ तासात ३८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १०० हून अधिक वर्षांत २४ तासांत झालेला हा विक्रमी पाऊस आहे. दोडा जिल्ह्यातही पावसाशी निगडीत दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.   या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल राष...

August 22, 2025 1:24 PM August 22, 2025 1:24 PM

views 8

जम्मूत विविध ठिकाणी ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जम्मूत विविध ठिकाणी छापे टाकले. यात प्रामुख्यानं भूमी कांड संबंधातल्या महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा आणि कार्यालयांचा समावेश आहे. त्यात बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित असलेली कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त केले गेल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. कर चुकविणं आणि अनियमित उत्पन्न याबाबत संशय असलेल्या अहवालांनुसार हे छापे टाकण्यात आले.

September 26, 2024 2:30 PM September 26, 2024 2:30 PM

views 15

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. कठुवा आणि उधमपूर जिल्ह्यातल्या चार प्रचारसभांना ते संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये प्रचारसभा घेतली. तसंच माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. हरियाणा विधानस...

August 5, 2024 1:08 PM August 5, 2024 1:08 PM

views 22

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला 5 वर्षे पूर्ण

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला आज 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी सुरक्षाउपाय करण्यात येत असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचं जम्मू चे पोलिस अधीक्षक अजय शर्मा यांनी सांगितलं आहे.

June 28, 2024 1:34 PM June 28, 2024 1:34 PM

views 14

अमरनाथ यात्रेला जम्मूहून प्रारंभ

सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून आरंभ झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूहून रवाना केलं. पहलगामहून उद्या यात्रा सुरु होईल. प्रशासनानं यात्रेकरूंसाठी ऑनलाईन नोंदणीसोबतच ऑफलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध ओळखपत्र सोबत असलेल्या यात्रेकरूंना २५० रुपये शुल्क भरून नोंदणी करता येईल.

June 16, 2024 2:41 PM June 16, 2024 2:41 PM

views 26

जम्मू – काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला या बैठकीला उपस्थित आहेत. गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपें...