November 12, 2025 1:24 PM November 12, 2025 1:24 PM

views 26

Jamaica: ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे ४५ जणांचा मृत्यू, १५ बेपत्ता

जमैकामध्ये ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे, तर १५ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पश्चिम जमैका मध्ये हे वादळ धडकलं होतं. त्यानंतर अजूनही दोन शहरांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु आहे.    या वादळात ३० हजारापेक्षा जास्त कुटुंब विस्थापित झाली असून १ हजारापेक्षा जास्त नागरिक ८८ निवारा छावण्यांच्या आश्रयाला असल्याची माहिती  स्थानिक प्रशासनानं दिली. 

October 1, 2024 8:13 PM October 1, 2024 8:13 PM

views 16

भारत आणि जमैका यांच्यात ४ सामंजस्य करार

डिजिटल पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि क्रीडा क्षेत्रात भारत आणि जमैका यांच्यात आज ४ सामंजस्य करार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अंड्र्यू होलनेस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षरी झाली. जमैकाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. विविध क्षेत्रांमधले भारताचे अनुभव जमैकाला द्यायला तयार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. जमैकन सैन्यालाही भारत प्रशिक्षण देणार आहे. गुन्हेगारी, अंमली पदार्थांची वाहतूक, दहशतवाद ही दोन्ही देशा...

September 30, 2024 9:01 AM September 30, 2024 9:01 AM

views 8

जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अँड्रयू होलनेस चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

जमैकाचे प्रधानमंत्री डॉक्टर अँड्रयू होलनेस आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जमैकाच्या प्रधानमंत्र्यांचा द्विपक्षीय स्तरावरील हा पहिलाच भारत दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे समपदस्थ यांच्या विविध मुद्यांवरील बैठकीच्या निमित्ताने यापुर्वी अनेकदा भेटी झाल्या आहेत. जमैकाचे प्रधानमंत्री या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तसंच विविध क्षेत्रातील व्यापार आणि औद्योगिक प्रतिनिधींबरोबर बैठकीत सहभागी होतील. द्विपक्षीय संबंधांना ...