April 1, 2025 7:39 PM April 1, 2025 7:39 PM

views 19

जालन्यात किक्रेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ७ जणांना अटक

आयपीएलमधल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आणखी सात संशयितांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संशयित काल झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुध्द मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरच्या एका हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. संशयितांकडून मोबाईल, रोख रक्कम, इतर साहित्य असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

March 29, 2025 7:34 PM March 29, 2025 7:34 PM

views 12

IPL वर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना जालन्यातून अटक

जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे ४ बुकी आणि एका सट्टेबाजाला चंदनझिरा पोलिसांनी आज अटक केली. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  पोलिसांनी या कारवाईत  मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्यासह एकूण ८ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

March 27, 2025 8:22 PM March 27, 2025 8:22 PM

views 12

जालन्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याऱ्यांना अटक

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या, कोलकत्ता नाईट रायडर विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. संशयितांकडून मोबाईल आणि इतर साहित्य, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

January 4, 2025 11:39 AM January 4, 2025 11:39 AM

views 16

जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक

जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

December 24, 2024 6:57 PM December 24, 2024 6:57 PM

views 8

जालन्यात जाफ्राबाद-चिखली मार्गावर प्रवासी बसला अपघात, १५ जखमी

जालनातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर आज सकाळी प्रवासी वाहतूक करणारी एक बस वीस फुट खड्डयात  कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक आणि वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चिखली आगाराची ही बस कोळेगाव घाट चढत असताना अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानंतर चालकाचं  बसवरचं  नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

September 22, 2024 7:17 PM September 22, 2024 7:17 PM

views 9

जालना जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज पुकारलेल्या जालना जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़.  घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केले. 

September 20, 2024 7:12 PM September 20, 2024 7:12 PM

views 13

जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात मठतांडा गावाजवळ आज एक एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर २३ जण जखमी झाले. जालना-वडीगोद्री महामार्गावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हा अपघात झाला. ही बस गेवराईहून जालन्याकडे निघाली असताना, समोरुन येत असलेला ट्रक या बसला धडकला.   त्यात बसचा वाहक आणि तीन प्रवासी, तसंच ट्रकचा चालक, आणि वाहक, असे सहाजण जागीच ठार झाले. जखमींपैकी १३ जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

August 26, 2024 8:47 AM August 26, 2024 8:47 AM

views 9

जालना औद्योगिक वसाहतीमधील स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू

जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी एका कामगाराचा काल छत्रपती संभाजीनगर इथ उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कंपनी मालकासह इतर दोघांना न्यायालयानं काल जामीन मंजूर केला.

August 24, 2024 6:35 PM August 24, 2024 6:35 PM

views 11

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात 22 कामगार जखमी

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या तीन गंभीर जखमी कामगारांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवलं आहे. या अपघातात एकूण 22 कामगार जखमी झाले असून इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

June 29, 2024 10:51 AM June 29, 2024 10:51 AM

views 11

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची गावाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलय.   सदर घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन साह्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी...