April 13, 2025 1:48 PM April 13, 2025 1:48 PM

views 9

जालियनवाला बाग हत्याकांडाला १०६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आदरांजली

जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०६ वर्षं पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. जालियानवाला बाग मैदानावर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राहील. त्यांच्या प्रेरणेने भारताचा प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहील, असं मुर्मू आपल्या संदेशात म्हणाल्या आहेत.   देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या शूरांचं अतुलनीय बल...