January 1, 2025 3:22 PM January 1, 2025 3:22 PM
4
जलजीवन मिशनअंतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
खामगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज बुलडाण्यात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प्रत्येक गावात पाण्याची टाकी बांधण्याकरता तातडीनं जागा उपलब्ध करून द्यावी तसंच खामगाव विधानसभा मतदारसंघातले सर्व प्रकल्प २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश फुंडकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.