September 6, 2024 1:29 PM September 6, 2024 1:29 PM
13
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं – प्रधानमंत्री
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे सूरत इथे, 'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीने केल्यानंतर ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेने विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जलसंचयानेच तोडगा निघू शकतो असं ते म्हणाले. सध्या सुरू असलेल्या 'जल श...