February 3, 2025 11:12 AM

views 28

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत

छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव...