December 4, 2025 1:28 PM December 4, 2025 1:28 PM
14
१५ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा, जलशक्ती मंत्र्यांची माहिती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सुरु केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १५ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना ही महिती दिली. चार कोटी नागरिकांना नळाद्वारे पेयजल पुरवण्याच्या योजनेचं काम सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या योजनांसाठी ३८ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचंही ते म्हणाले.