December 21, 2024 2:34 PM December 21, 2024 2:34 PM

views 11

जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर

जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास समिती स्थापन केली आहे. काल सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर हा अपघात झाला होता.

August 25, 2024 8:33 PM August 25, 2024 8:33 PM

views 5

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी – प्रधानमंत्री

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जयपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.    न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून अनेक कालबाह्य कायदे सरकारनं रद्द केले आहेत. नुकतेच नवे फौजदारी कायदे लागू केल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशातल्या १८ हजार न्यायालयात ई- कोर्ट प्रणाली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. याव...