April 13, 2025 6:56 PM April 13, 2025 6:56 PM
3
राज्यात जयभीम पदयात्रेचं आयोजन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या. नरिमन पॉइंट पासून मंत्रालयातल्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले. आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोलीतल्या बाबासाहेबांच्या ज्ञानस्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश...