July 7, 2025 8:10 PM July 7, 2025 8:10 PM

views 7

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या तीन स्तंभांमधे समतोल असला पाहिजे-उपराष्ट्रपती

कायदेमंडळ/ संसद, कार्यकारी मंडळ/सरकार आणि न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या तीन स्तंभांमधे समतोल असला पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.  उपराष्ट्रपती  दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून  ते आज कोच्चीच्या  प्रगत विधी अभ्यास राष्ट्रीय विद्यापीठात  विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. शांतता आणि सौहार्दावर आधारलेल्या जगाच्या निर्मितीत  भारताची भूमिका महत्त्वाची  असल्याचं ते म्हणाले.    

March 25, 2025 1:35 PM March 25, 2025 1:35 PM

views 13

न्यायाधीशांच्या घरातून रोकड जप्त केल्याच्या मुद्द्यावरून सभागृह नेत्यांची बैठक

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या घरातून रोकड जप्त केल्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज संध्याकाळी सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे. हा गंभीर विषय असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.