July 12, 2025 8:18 PM July 12, 2025 8:18 PM

views 40

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शिकवणी वर्ग हे अडथळे असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं मत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शिकवणी वर्ग हे अडथळे आहेत असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज मांडलं. ट्रिपल आयटी कोटाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शिकवणी वर्गांच्या जाहिरातींवरही त्यांनी आक्षेप घेतला.   या जाहिरातींसाठी पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. पारंपरिक मार्ग वगळून इतर नव्या क्षेत्रातल्या संधींकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

March 1, 2025 1:34 PM March 1, 2025 1:34 PM

views 19

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.

June 19, 2024 1:41 PM June 19, 2024 1:41 PM

views 45

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहेत, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मध्यप्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.   सिकलसेल आजाराचं निर्मूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून २०४७ मध्ये भारत पूर्णपणे सिकलसेलमुक्त होईल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तसंच आपल्या राज्यघटनेमध्ये आदिवासी समुदायासाठी अनेक विशेष तरतुदी असून त्याची पूर्तता करण्यात सरकारने कोणतीही कसर ठेव...