July 11, 2025 9:26 AM

views 21

क मूल्य साखळीतील एक विश्वासार्ह भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर – उपराष्ट्रपती

क मूल्य साखळीतील एक विश्वासू भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर भक्कम आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे.  नवी दिल्ली इथं CII-ITC शाश्वतता पुरस्कार समारंभात ते काल बोलत होते.   उपराष्ट्रपती म्हणाले की, सध्या जगात गोंधळ आणि अशांतता आहे. जागतिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पुरवठा साखळीत व्यत्यय येत आहे. अशा परिस्थितीत, भारत हा एक प्रमुख आवाज आहे.   भारताच्या शाश्वत विकासाच्या विकासावर प्रकाश टाकताना धनखड म्हणाले की, भा...

May 5, 2025 9:53 AM

views 18

विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो- उपराष्ट्रपती

विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो. म्हणूनच, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणि समृद्धी आणण्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि विद्यार्थ्यांची आहे, असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. ते काल मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथल्या राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संवादात्मक कार्यक्रमात बोलत होते.   शेतकरी केवळ पीक उत्पादक राहू नयेत, तर ते कृषी-उद्योजक बनतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृषि विद्यार...

February 22, 2025 7:51 PM

views 31

देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

विकसित भारतासाठी नव्या संधींचा उपयोग करत देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज व्यक्त केलं.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ व्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित होते.  देशात प्रचंड क्षमता असून पायाभूत सुविधा, दळणवळण, इंटरनेट सुविधा, तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करुन आपण पुढे जात असल्याचं ते म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पी.एम.उषा मेरु योजने अंतर्गत मंजूर चार इमारतींचं दृकश्राव्य पद्धतीने भूमिपूजन करण्यात आल...

January 24, 2025 9:27 AM

views 19

उपराष्ट्रपती आज बिहार आणि उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज बिहार आणि उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर जात असून,बिहार मधल्या समस्तीपुर इथ भारतरत्न करपुरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसच आज उत्तरप्रदेश चा स्थापना दिन आहे. त्यानिमित्त लखनौ इथ आयोजित विशेष समारंभाला ही उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

January 17, 2025 10:08 AM

views 28

उपराष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या लक्षद्विप दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तीन दिवसांच्या लक्षद्विप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, विविध सार्वजनिक प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच स्वयं-सहाय्यता गट आणि त्यांचे लाभार्थी यांच्याशी ते संवाद साधतील.

January 11, 2025 8:18 PM

views 30

परीक्षा आणि मुलाखती पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे दिसलं पाहिजे-उपराष्ट्रपती

परीक्षा आणि मुलाखती या पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे दिसून आलं पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज बंगळुरू इथं राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या २५ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले.  कुठल्याही प्रकारच्या पक्षपातापासून मुक्त असावा यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करणं ही देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांची दूरदृष्टी होती, असं धनखड म्हणाले. नोकरशहा आणि राजकारण्यांकडून आपल्या जोडीदारासाठी उच्च पदं मिळवण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचं सांगत निवृत्तीनंतरच्या पदनिय...

December 14, 2024 5:10 PM

views 23

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्ली येथे आयपी आणि टीएएफएसच्या 50 व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित केले

अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशाप्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या ५० व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हींमधील सुसंवाद ही यशाची गुरुकिल्ली असल्याचं धनखड यांनी सांगितलं.

November 30, 2024 2:41 PM

views 27

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. दोइमुख इथल्या राजीव गांधी विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षान्त समारंभाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमानंतर ते इटानगर इथं अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

November 9, 2024 8:10 PM

views 27

शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान देणं आपलं कर्तव्य आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षणात गुंतवणूक हा समाजसेवेचा सर्वात प्रभावी मार्ग आहे कारण यामुळे मनुष्यबळ समृद्ध होऊन वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुरक्षित राहतं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौथ्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान देणं आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. जगात अनेक अग्रगण्य शिक्षणसंस्था त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाश्वत पाठिंब्यावर आणि उत्साहाच्या बळावर भरभराट करताना दिसत आहेत असं त्यांनी म्हटलं.

September 14, 2024 1:15 PM

views 32

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते, दूरस्थ मध्यमातून, मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल कॉलेजमध्ये, राज्यभरातल्या ४३४ आयटीआय संस्थांमधील संविधान मंदिरांचं उद्घाटन करतील. तसंच, नागपूर इथल्या रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.