June 30, 2025 9:49 AM June 30, 2025 9:49 AM
11
पुरी इथं झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
ओडिशातील जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी इथं श्री गुंडीचा मंदिराजवळ काल सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशीचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत. यामध्ये दोन महिलांसह तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या विकास विभागाच्या आयुक्त अनु गर्ग या घटनेची चौकशी करतील. ओडिशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काल पहाटे साडेचारच्या दरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांवर, नंदीघोश, तालध...