February 16, 2025 8:09 PM February 16, 2025 8:09 PM
3
अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत युगांडाच्या जेकब किप्लिमोचा विश्वविक्रम
बार्सिलोना इथे झालेल्या अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत युगांडाच्या जेकब किप्लिमो या खेळाडूने ५७ मिनिटांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण करत एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने ५६ मिनिटं, ४२ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. त्याने इथियोपियाच्या योमिफ केजेलचा याने केलेला ५७ मिनिटं ३० सेकंदांचा जुना विक्रम मोडला.