December 8, 2024 10:26 AM

views 19

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही – जे. पी. नड्डा

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल सांगितलं. पंचकुला इथून 100 दिवसांच्या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल तसंच क्षयरोगाचा विळखा मोडून काढण्यासाठी धोरणबदलासह सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. क्षयरोगाच्या रुग्णांना आयुष्मान भारत-प्...

November 22, 2024 1:03 PM

views 22

काँग्रेसने मणिपूरमधली परिस्थिती संवेदनशील केल्याचा भाजपचा आरोप

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर मणिपूरमधली परिस्थिती जाणीवपूर्वक संवेदनशील केल्याचा आरोप केला आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राला नड्डा यांनी उत्तर दिलं आहे. मणिपूरमधली शांतता भंग करण्यासाठी कट्टरतावादी संघटना सातत्याने प्रयत्न करत राहतात, हे काँग्रेसच्या प्रशासनाचं अपयश आहे, अशी टीका नड्डा यांनी आपल्या पत्रात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे गेल्या दहा वर्षांत ईशान्य भारतात अ...

September 14, 2024 3:15 PM

views 19

मंबईत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत होत आहे. निवडणुकीसाठी नेत्यांना दिलेल्या जबाबदारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, उपस्थित आहेत. त्याआधी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली.

July 10, 2024 6:46 PM

views 16

डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकार विविध योजना तयार करीत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

देशभरात डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकार विविध योजना तयार करीत असून राज्यसरकारांबरोबरही संपर्कात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. डेंग्यू विषयी मदत, मार्गदर्शन आणि माहितीसाठी एक विशेष हेल्पलाईन केंद्रीय आरोग्यमंत्रालय सुरु करणार असून राज्यसरकारांनी देखील अशा हेल्पलाईन सुरु कराव्या असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रुग्णालयांनी डेंग्यूप्रतिबंध आणि निवारणासाठी सज्ज रहावं, तसंच संबंधित विभागांनी आपसात ताळमेळ ...

June 25, 2024 9:24 AM

views 26

राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेला आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते प्रारंभ

  केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू थांबवणं हा या मोहिमेचा हेतू आहे. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेत पाच वर्षांखालच्या बालकांना ओआरएस आणि झिंकची पाकिटं देण्यात येणार आहेत. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान आणि आयुष्मान आरोग्य मंदिर नेटवर्क यासारख्या उपक्रमांमुळे अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पट...