March 17, 2025 7:49 PM March 17, 2025 7:49 PM

views 15

काश्मीर कुपवारा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अज्ञात दहशतवादी ठार

उत्तर काश्मीरातल्या कुपवारा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानं प्रत्युत्तर दिलं. घटनास्थळावरुन एक एके ४७ रायफल जप्त करण्यात आली, असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.  

September 30, 2024 7:51 PM September 30, 2024 7:51 PM

views 11

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांची व्यापक शोधमोहीम

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत नुकत्याच झालेल्या चकमकीनंतर आज सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम राबवली. कठुआ जिल्ह्यातल्या बिल्लवर तालुक्यातल्या कोग मंडली जंगल परिसरात शनिवारी संध्याकाळी पोलीस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण आलं होतं तसंच एक दहशतवादी  ठार झाला होता. तर रजौरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली होती. या पार्श्वभूमीवर आज सलग तिसऱ्या दिवशी शोधमोहीम राबवण्यात आली.