June 21, 2024 3:06 PM June 21, 2024 3:06 PM

views 20

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं हे भारतीयांचं कर्तव्य – राज्यपाल रमेश बैस

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार-प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.   भारतीय जीवनशैलीची आयुर्वेद आणि योगा ही विशेष अंग - मुख्यमंत्री शिंदे     भारतीय जीवन शैलीची आयुर्वेद आणि योगा ही दोन विशेष अंगं आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते...

June 20, 2024 7:07 PM June 20, 2024 7:07 PM

views 11

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशोदेशी कार्यक्रम होत आहेत. बांगलादेशात भारतीय राजदूतावासानं ढाका येथील मिरपूर इनडोअर स्टेडिअममध्ये उद्या योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमात बांगलादेशची योग संघटना सहभागी होणार आहे. बांगलादेशातले भारतीय राजदूत प्रणय वर्मा सर्वांचं स्वागत करणार आहेत.   नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं काल पोखरा इथं फेवा तलावाच्या काठी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. त्यात स्थानिक रहिवासी, स्थानिक प्रशासन यंत्रणांचे अधिकारी, भारतीय लष्करातील निवृत्त गोरखा...

June 19, 2024 7:26 PM June 19, 2024 7:26 PM

views 12

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात योग विद्या निकेतनचे कार्याध्यक्ष महेश सिनकर आणि प्रशिक्षक सुनील भुजबळ यांनी मार्गदर्शन करत योगासनांची प्रात्यक्षिकंही दाखवली.   [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/06/yoga.mp4"][/video]   सुनील भुजबळ यांची मुलाखत शुक्रवारी २१ जूनला सकाळी ११ वाजता एफ एम गोल्ड वरून तर महेश सिनकर यांची मुलाखत एफ एम रेनबोवर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होईल.