May 27, 2025 8:34 PM May 27, 2025 8:34 PM

views 6

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. विवरण पत्र भरण्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात विलंब झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षी ३१ जुलै पर्यंत करदात्यांना परताव्यासाठी विवरणपत्र भरता येतात. मात्र, यंदा १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवल्याची तपशीलवार अधिसूचना नंतर जाहीर होईल,  असं सीबीडीटीच्या एक्स समाजमाध्यमावर म्हटलं आहे.