July 30, 2025 3:53 PM July 30, 2025 3:53 PM

views 9

ITI मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

राज्यातल्या ITI अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यानुसार आता ७० ITI मध्ये सोलर टेक्निशियन, ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम  शिकविण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातल्य़ा ३६ जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दर्जावाढ करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

May 8, 2025 7:33 PM May 8, 2025 7:33 PM

views 6

ITI मध्ये नव्या अभ्यासक्रमाची घोषणा…

‘आयटीआय’ मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून, येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. त्याअंतर्गत ठाण्याच्या राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्ष...