July 2, 2025 2:20 PM July 2, 2025 2:20 PM

views 5

विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जेनिक सिनर याने इटलीच्या लुका नार्डीचा केला पराभव

टेनिस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरच्या जेनिक सिनर याने विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या लुका नार्डी याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आतापर्यंत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविचने फ्रेंच खेळाडू अलेक्झांड्रे मुलर विरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ४ सेटमध्ये विजय मिळवून आठव्या विम्बल्डन विजेतेपदासाठी पाऊल पुढं टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती ठरलेली कोको गॉफ हिला विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. य...

May 5, 2025 1:18 PM May 5, 2025 1:18 PM

views 14

एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात

आशियाई विकास बँकेच्या म्हणजेच एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात होणार आहे. या चार दिवसीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत.   त्याचबरोबर, एडीबीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या गव्हर्नरांसमवेत बैठका घेतील, तसंच सीतारामन इटली, जपान आणि भूतान च्या अर्थमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चादेखील करणार आहेत. त्याचबरोबर मिलानमधल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार...

March 12, 2025 8:26 PM March 12, 2025 8:26 PM

views 12

इटलीमधे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची दोन सुवर्ण पदकांची कमाई 

 इटली मधल्या तुरिन इथं सुरु असलेल्या १२ व्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी  दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकं पटकावत भारतानं उत्साहवर्धक सुरुवात केली आहे. स्नो बोर्डिंग क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत  समीर यादव आणि भारती यांनी सुवर्ण पदकं तर हेमचंद आणि हर्षिता ठाकूर यांनी रजत पदकं पटकावली. या स्पर्धांमध्ये भारताचे ३०  क्रीडापटु सहभागी झाले आहेत.  १०२ देशांमधल्या सुमारे पंधराशे खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धांमध्ये ८ विविध क्रीडाप्रकार समाविष्ट असणार आहेत.

March 8, 2025 8:56 PM March 8, 2025 8:56 PM

views 8

इटली सरकारची एका विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

जागतिक महिला दिनानिमित्त इटली सरकारनं आज एका विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. या विधेयकानुसार देशात पहिल्यांदाच स्त्रीहत्येची कायदेशीर व्याख्या करत, या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे. इटलीतील महिलांवरील वाढता हिंसाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं हा कायदा केला जाणार आहे.    दरम्यान, आज महिला दिनानिमित्त तुर्कीए शहरात हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून महिलांवरील हिंसाचाराचा निषेध केला.

September 20, 2024 12:25 PM September 20, 2024 12:25 PM

views 13

इटलीमध्ये बोरिस वादळामुळे २४ जणांचा मृत्यू

बोरिस वादळामुळे मध्य युरोपात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. नद्यांचे पाणी इटलीच्या एमिलिया रोमग्ना प्रांतातल्या अनेक शहरांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या भागातल्या शाळा, कार्यालय, रेल्वे सेवा सध्या बंद आहेत.

July 14, 2024 12:09 PM July 14, 2024 12:09 PM

views 6

उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. तिथे रेजिओ कॅलाब्रिया इथे होणाऱ्या जी7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होतील. तसंच, सहभागी राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्ये गोयल सहभागी होतील. ही भेट व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधींचं प्रदर्शन करणार्‍या भारताच्या धोरणात्मक प्रयत्नांना अधोरेखित करत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.   इटलीला भेट देण्यापूर्वी गोयल आज आणि उद्या स्वित्झर्लंडमध्ये ...

June 14, 2024 7:45 PM June 14, 2024 7:45 PM

views 19

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या क...