November 8, 2025 6:37 PM November 8, 2025 6:37 PM

views 19

ISSF World Championship : भारताचा रविंदर सिंह याची सुवर्णपदकाला गवसणी

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा रविंदर सिंह यानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यानं पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात ५६९ गुणांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं. तसंच, रविंदर सिंह, कमलजीत आणि योगेश कुमार यांच्या संघानं पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात १ हजार ६४६ गुण मिळवून रौप्यपदकावर नाव कोरलं.

November 6, 2025 7:23 PM November 6, 2025 7:23 PM

views 22

ISF नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार

इजिप्तमध्ये कैरो इथे आजपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे.  पिस्तुल प्रकारात मनू भाकर, ईशा सिंग आणि सुरूची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील. रायफल नेमबाजीत, रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे सहभागी होतील, अनुभवी नेमबाज एलाव्हेनिल वलारिवन, सिफ्ट कौर समरा, अर्जुन बाबुता, अनिश भानवाला आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांचाही भारतीय चमूत सहभाग आहे. स्पर्धेत ७२ देशांतील ७२० नेमबाज सहभागी होतील. 

October 18, 2025 8:10 PM October 18, 2025 8:10 PM

views 20

ISSF जागतिक शॉटगन २०२५ स्पर्धेत भारताच्या झोरावर सिंहला कांस्यपदक

ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ (ISSF) जागतिक शॉटगन २०२५ स्पर्धेत भारतीय नेमबाज झोरावर सिंह यानं पुरुष गटात कांस्यपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत खराब हवामान आणि अंधुक प्रकाश यावर मात करून त्यानं ५०पैकी ३१ गुण मिळवले आणि तिसरं स्थान मिळवलं.