September 24, 2025 8:17 PM September 24, 2025 8:17 PM

views 20

ISSF Junior World Cup: ज्युनियर विश्वचषक स्पर्धा नवी दिल्लीत सुरू

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून उद्यापासून मुख्य स्पर्धा सुरु होत आहेत. भारतीय चमूत ६९ खेळाडू आहेत. डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज इथे ही स्पर्धा होत असून ती २ ऑक्टोबर पर्यंत चालेल. भारतासह अमेरिका,इटली,इराण,ब्रिटन कतार,स्पेन अशा मान्यवर देशातले २१ वर्षाखालचे खेळाडू या स्पर्धेत रायफल ,पिस्टल,शॉटगन असा विविध क्रीडाप्रकारात आपलं नैपुण्य पणाला लावतील. कनिष्ठ गट विश्वचषकाची ही ११वी खेप असून भारतात ती पहिल्यांदाच होत आहे.

June 14, 2025 8:31 PM June 14, 2025 8:31 PM

views 9

ISSF World Cup 2025 : आर्या बोरसे आणि अर्जुन बबुताला सुवर्ण पदक

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोरसे आणि अर्जुन बबुतानं सुवर्ण पदक पटकावलं. जर्मनीतल्या म्युनिचमध्ये १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत त्यांनी ही कामगिरी केली.    स्पर्धेतलं भारताचं दुसरं सुवर्ण आणि एकूण चौथं पदक आहे. यापूर्वी सुरूची सिंगनं सुवर्ण पदक पटकावलं असून सिफ्ट कौर समरा आणि एलावेनिलनं कांस्य पदक जिंकलं आहे.

April 23, 2025 3:27 PM April 23, 2025 3:27 PM

views 12

आयएसएसएफ स्पर्धेत भारत 7 पदकं जिंकत तिसऱ्या स्थानावर

आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं आयोजित केलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं सात पदकं जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.   सिमरनप्रीत कौर ब्रार हिनं २५ मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. अमेरिका एकूण सात पदकं जिंकत स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीनने चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांची लयलूट करत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

April 22, 2025 2:35 PM April 22, 2025 2:35 PM

views 17

नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत सिमरनप्रीत कौर हिला रौप्यपद

पेरुमध्ये लिमा इथे सुरु असलेल्या ISSF नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सिमरनप्रीत कौरने वरिष्ठ गटातलं रौप्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सातत्याने सुवर्णपदक पटकावणाऱ्या चीनच्या सुन युजीएला सुवर्ण तर चीनच्याच युओ क्विंझनला कांस्य पदक मिळालं.  या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या पदक संख्येत आता रौप्यपदकाची भर पडली आहे. 

April 3, 2025 1:32 PM April 3, 2025 1:32 PM

views 16

ISSF करंडक नेमबाजी स्पर्धा आजपासून अर्जेटिंनात सुरू होणार

आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ म्हणजे आयएसएसएफ करंडक आजपासून अर्जेटिंनातील ब्युनॉस आयर्स इथं सुरू होत आहे. भारताची ऑलिंपिक विजेती नेमबाज मनू भाकर भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. स्पर्धेत ४५ देशांमधील चारशे नेमबाज सहभागी होत आहेत. भारताचे सौरभ चौधरी, अनिश भंवाला यांच्यासह ४३ नेमबाज स्पर्धेत सहभागी होत आहेत. 

December 21, 2024 6:38 PM December 21, 2024 6:38 PM

views 13

पुढल्या वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा स्पर्धांचं यजमान पद भारताकडे

आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं भारताला पुढल्या वर्षीच्या जुनिअर वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. या स्पर्धांमध्ये  रायफल, पिस्तूल तसंच शॉटगन प्रकारच्या नेमबाजी स्पर्धांचा समावेश असणार आहे. त्याबाबतचं  वेळापत्रक  अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र या स्पर्धांचं यजमान पद भूषवण्याची संधी मिळणार असल्यानं  भारतातल्या   राष्ट्रीय रायफल संघटनेचा दबदबा वाढला आहे.     दरम्यान नेमबाजीच्या  आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करण्याची भारताची ही अलीक...

October 17, 2024 2:48 PM October 17, 2024 2:48 PM

views 11

जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अनंतजीत सिंग याला स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली. कालच्या पात्रता फेरीत सेखॉननं 125 पैकी 122 लक्ष्य वेधून राष्ट्रीय विक्रम नोंदवला.आज होणाऱ्या इतर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विवान कपूर हा खेळाडू दुपारी 2 वाजता पुरुषांच्या ट्रॅप फायनलमध्ये खेळेल.

October 16, 2024 9:38 AM October 16, 2024 9:38 AM

views 23

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकरला रौप्य पदक

नवी दिल्ली इथं काल झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मसकर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिने 252 पूर्णांक 9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंगनं सुवर्ण, तर फ्रान्सच्या ओसियन मुलरनं कास्य पदक पटकावलं.