May 23, 2025 1:32 PM

views 24

ISSF ज्युनिअर वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत भारताची 1 सुवर्ण, 2 रौप्य पदकांची कमाई 

जर्मनी इथं सुरू असलेल्या  ISSF ज्युनिअर वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रियाझ धिल्लो हिनं रौप्य पदक पटकवलं. रियाझनं ६० पैकी ५१ लक्ष्यं साध्य केली. या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूनं सुवर्णपदक तर जर्मनीच्या ॲनाबेला हिनं कांस्य पदक जिंकलं.   महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तोल प्रकारात कनक हिनं सुवर्ण तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात एड्रियन कर्माकर यानं रौप्य पदक मिळवलं आहे. दरम्यान, स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण, दोन रौप्य पदक मिळवत पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

April 23, 2025 3:27 PM

views 17

आयएसएसएफ स्पर्धेत भारत 7 पदकं जिंकत तिसऱ्या स्थानावर

आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं आयोजित केलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं सात पदकं जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.   सिमरनप्रीत कौर ब्रार हिनं २५ मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. अमेरिका एकूण सात पदकं जिंकत स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीनने चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांची लयलूट करत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

April 22, 2025 2:35 PM

views 24

नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत सिमरनप्रीत कौर हिला रौप्यपद

पेरुमध्ये लिमा इथे सुरु असलेल्या ISSF नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सिमरनप्रीत कौरने वरिष्ठ गटातलं रौप्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सातत्याने सुवर्णपदक पटकावणाऱ्या चीनच्या सुन युजीएला सुवर्ण तर चीनच्याच युओ क्विंझनला कांस्य पदक मिळालं.  या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या पदक संख्येत आता रौप्यपदकाची भर पडली आहे. 

April 17, 2025 9:53 AM

views 14

ISSF: भारताच्या इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरीला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक

जागतिक नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आयएसएसएफच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरी यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. त्यांनी चीनच्या कियानझून याओ आणि कैहू यांचा १७-९ असा पराभव केला. पेरूतील लिमा इथं ही स्पर्धा सुरू आहे. आज महिलांच्या स्किट स्पर्धेत भारताची रायझा धिल्लों अंतिम स्पर्धेत कौशल्य दाखवणार आहे.

April 3, 2025 1:32 PM

views 21

ISSF करंडक नेमबाजी स्पर्धा आजपासून अर्जेटिंनात सुरू होणार

आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ म्हणजे आयएसएसएफ करंडक आजपासून अर्जेटिंनातील ब्युनॉस आयर्स इथं सुरू होत आहे. भारताची ऑलिंपिक विजेती नेमबाज मनू भाकर भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. स्पर्धेत ४५ देशांमधील चारशे नेमबाज सहभागी होत आहेत. भारताचे सौरभ चौधरी, अनिश भंवाला यांच्यासह ४३ नेमबाज स्पर्धेत सहभागी होत आहेत. 

April 2, 2025 1:39 PM

views 78

ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी

अर्जेंटिना इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी होत आहेत. या पथकाचं नेतृत्व ऑलिंपिक पदक विजेती मनु भाकर करणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज होणार आहे. या स्पर्धेत एअर रायफल, एअर पिस्तुल आणि शॉटगन प्रकार असून त्या ४५ देशांमधले ४०० हून अधिक नेमबाज सहभागी होत आहेत.   भारताच्या संघात मनु भाकरसह सौरभ चौधरी, अनिश भानवाला, विजयवीर सिद्धु, ईशा सिंग, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, सिफ्त कौर समरा, अर्जुन बबुता, पृथ्वीराज तोंडाईमन, अनंतजीत सिंग नरुका आण...

October 2, 2024 1:32 PM

views 14

आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत १० सुवर्णपदकांसह १४ पदकं मिळवून भारत अग्रस्थानी

इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या दिवांशी हिने सुवर्ण पदक पटकावलं. तसंच, भारताच्या तेजस्विनी, दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेच्या सांघिक प्रकारात देखील सुवर्ण पदकाची कमाई केली. सध्या या स्पर्धेत भारत १० सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कास्यपदक अशा १४ पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे.

September 30, 2024 1:51 PM

views 23

ISSF ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला २ सुवर्ण आणि ३ कांस्य पदक

पेरुमध्ये लिमा इथं सुरु असलेल्या ISSF ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांसह आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. एअर रायफल प्रकारात काल गौतमी भानोत आणि अजय मलिक या भारतीय जोडीने क्रोएशियाला १७-९ असं हरवत कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत काल चीनने फ्रान्सला हरवून सुवर्णपदक पटकावलं. एअर पिस्तोल संमिश्र प्रकारात लक्षिता आणि प्रमोद यांनी कनिष्का डागर आणि मुकेश नेलवाणीला १६-८ असं हरवत अजून एक कांस्यपदक पटकावलं. याप्रकारात जर्मनीला सुवर्णपदक तर युक्रेनला रौप्यपदक मिळालं.