April 21, 2025 1:46 PM April 21, 2025 1:46 PM

views 16

SpaDeX Mission: अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी

इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरीत्या करण्यात आली. गेल्या ३० डिसेम्बरला पी एस एल वी - सी सिक्सटी मोहिमेनंतर स्पेडेक्स अंतर्गत उपग्रहांची जोडणी १६ जानेवारीला पहिल्यांदा करण्यात आली होती तर १३ मार्च रोजी ते यशस्वीपणे वेगळे करण्यात आले होते. यापुढचे प्रयोग येत्या दोन आठवड्यांत केले जाणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली.

January 17, 2025 9:35 AM January 17, 2025 9:35 AM

views 6

इस्त्रोची स्पेडेक्स मोहिम यशस्वी

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग काल यशस्वी झालं. या मोहिमेअंतर्गंत अवकाशात सोडलेल्या चेसर आणि टार्गेट या दोन उपग्रहांना इस्रोनं यशस्वीरित्या जोडलं. इस्रोच्या या यशामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे.   अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. चंद्रयान 4 आणि भारतीय अंतराळ स्थानक उभारणीसारख्या भविष्यातील अनेक मोहिमांसाठी याचा इस्रोला मोठा उपयोग होणार आहे. इस्रोच्या या यशाबद्दल राष्...

January 16, 2025 1:43 PM January 16, 2025 1:43 PM

views 15

इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली. असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं मिळवलेलं हे यश आगामी अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. इस्रोच्या संशोधकांनी साध्य केलेलं यश हे अतिशय अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय व...