August 16, 2024 1:23 PM August 16, 2024 1:23 PM
14
SSLVD3 च्या माध्यमातून EOS – 08 या पृथ्वी निरीक्षक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ- डेमो सॅट प्रवासी उपग्रह आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती, इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी दिली . एसएसएलव्हीचं हे तिसरं प्रक्षेपण आहे. याबरोबरंच भारत, सूक्ष्म, लहान आणि नॅनो उपग्रह पाठवायला सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे, असंही ते म्हणाले. पाळत ठेवणं, आपत्ती निरीक्षण, आग शोधणं, ज्वालामुखीची, महासागराच्या पृष्ठभागावरील वारे, मातीतील ओलावा, आदी घडामोडींची...