January 7, 2025 2:17 PM January 7, 2025 2:17 PM

views 7

इस्रोचा स्पॅडेक्स डॉकिंग प्रयोग आता 9 जानेवारीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचा म्हणजे अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी नियोजित असणारा हा प्रयोग आता दोन दिवसांनी म्हणजे 9 तारखेला होणार आहे. इस्रोनं समाजमाध्यमावरून ही माहिती दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग प्रक्रियेला ग्राउंड सिम्युलेशनद्वारे आणखी प्रमाणीकरण आवश्यक आहे. या कारणामुळे डॉकिंगचा प्रयोग आता आता 9 जानेवारीला करण्यात येणार आहे.

December 30, 2024 2:54 PM December 30, 2024 2:54 PM

views 7

अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इसरो सज्ज

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्त्रोचा अग्निबाण, 476 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.  ही कामगिरी करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल. केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच आत्तापर्यंत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रा आघाडी  घेईल.

December 28, 2024 7:59 PM December 28, 2024 7:59 PM

views 11

इसरो येत्या सोमवारी अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार

इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या सोमवारी स्पेडेक्स म्हणजेच अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अंतराळात दोन यानांचं विलीनीकरण होणार असल्याने इसरोचा हा प्रयोग ऐतिहासिक ठरणार असल्याचं ते म्हणाले. याद्वारे अंतराळात यानांचं विलीनीकरण करण्यात प्रभुत्व असणाऱ्या देशांच्या यादीत भारतही आपल्या नावाची नोंद करणार असल्याचं सिंग यांनी सांगितलं. 

December 25, 2024 12:35 PM December 25, 2024 12:35 PM

views 8

इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या मिशन अंतर्गत एकाचवेळी दोन उपग्रहांचं एकत्रित प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या 30 डिसेंबरला सोमवारी श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होणार आहे. एकत्रित प्रक्षेपपणानंतर दोन्ही उपग्रह विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत कार्यरत राहतील. अशाप्रकारचं मिशन राबवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.

December 5, 2024 7:07 PM December 5, 2024 7:07 PM

views 11

इस्रोच्या पीएसएलव्ही सी ५९ यानाचं यशस्वी प्रक्षेपण

इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रोबा ३ उपग्रह घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही सी ५९ प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आकाशात झेपावल्यावर  १८ मिनिटांनी  हे यान त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहोचलं आणि  एकूण ५४५ किलो वजनाचे २ उपग्रह पृथ्वीपासून ६०० किलोमीटर अंतरावर स्थापित केले. हे २ उपग्रह सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करतील. या यशस्वी प्रक्षेपणातून इस्रोनं आपलं तांत्रिक कौशल्य सिद्ध करत व्यवसायिक क्षेत्रात महत्वाचा टप्पा गाठला आहे. 

December 4, 2024 7:57 PM December 4, 2024 7:57 PM

views 10

इस्त्रोच्या पीएसएल व्हीसी ५९ प्रक्षेपकाचं उड्डाण लांबणीवर

इस्त्रोच्या पीएसएल व्हीसी ५९ प्रक्षेपकाचं उड्डाण लांबणीवर पडलं असून आता उद्या हा प्रक्षेपक अंतराळात झेपावेल, असं इसरोनं समाजमाध्यमावर जाहीर केलं आहे. प्रोबा ३ हे युरोपीय उपग्रह उद्या संध्याकाळी चार वाजून १२ मिनिटांनी प्रक्षेपित केले जातील.

December 3, 2024 7:24 PM December 3, 2024 7:24 PM

views 8

इस्रो ‘पीएसएलव्ही-सी’ या अंतराळयानाचं प्रक्षेपण करणार

इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थकडून उद्या पीएसएलव्ही-सी या अंतराळयानाचं प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरिकोटात सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या दुपारी ४ वाजून ८ मिनिटांनी हे यान प्रक्षेपित केलं जाईल.  हे अंतराळ यान युरोपीय अंतराळ संस्थेचे ३ उपग्रह पृथ्वीच्या सर्वात लांब असलेल्या कक्षेत प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह सूर्याची सर्वात बाह्य कक्षा, तिथलं वातावरण तसंच अवकाशातल्या हवामानाचा अभ्यास करतील. 

September 19, 2024 10:46 AM September 19, 2024 10:46 AM

views 11

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

भारतीय  अंतराळ  संशोधन  संस्था  अर्थात  इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी  बोलत  होते.   मानवरहित मोहिमेसाठी ऑर्बिटल मॉड्यूल तयार होत असून लवकरच ते श्रीहरिकोटा इथं हलवले जाईल असंही  त्यांनी  सांगितलं. ही मोहीम या वर्षाच्या अखेरीस नियोजित आहे. नुकत्याच  झालेल्या पुष्पक प्रक्षेपण वाहना...

September 19, 2024 10:08 AM September 19, 2024 10:08 AM

views 8

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   मानवरहित मोहिमेसाठी ऑर्बिटल मॉड्यूल तयार होत असून लवकरच ते श्रीहरिकोटा इथं हलवले जाईल असंही त्यांनी सांगितलं. ही मोहीम या वर्षाच्या अखेरीस नियोजित आहे. नुकत्याच झालेल्या पुष्पक प्रक्षेपण वाहनाच्या यशस...

August 16, 2024 2:46 PM August 16, 2024 2:46 PM

views 28

गगनयान मोहिमेतलं पहिलं यान या वर्षाच्या शेवटी प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन

या वर्षाच्या शेवटी, गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करुन अभियान राबवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.   तसंच मानवी मोहिमेतील अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी गॅमा किरणांचं प्रमाण, अतिनील किरणोत्सर्गाचं प्रमाण आणि कॉस्मिक किरणोत्सर्ग तपासण्यासाठी आधुनिक सेंसर्स बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं ते म...