May 19, 2025 1:27 PM May 19, 2025 1:27 PM
5
उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन
पीएसएलव्ही अग्निबाणाद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह, ईओएस-09 कक्षेत स्थापित करण्यात अपयश आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक समिती स्थापन केली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की समितीने काल व्यापक चर्चा केली. संबंधित अग्निबाणाने चारपैकी पहिले दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले मात्र तिसऱ्या टप्प्यात एक विसंगती आढळून आली आणि मोहीम पूर्ण होऊ शकली नसल्याचं डॉ. नारायणन यांनी म्हटलं आहे. इस्रो आपले प्रक्षेपण कार्यक्रम पुढे सुरू ठेवणार असून या...