December 24, 2025 2:54 PM December 24, 2025 2:54 PM
30
इसरोकडून अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ने आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. अमेरिकी ब्ल्यूबर्ड उपग्रह हा भारतीय अंतराळयानाने प्रक्षेपित केलेला आजवरचा सर्वात जड उपग्रह असून हे प्रक्षेपण अतिशय अचूकतेने झाल्याबद्दल इसरो चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सर्व सहभागी तंत्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. उपराष्ट्रपती सी पी ...