July 27, 2024 8:05 PM July 27, 2024 8:05 PM

views 19

गाझामध्ये इस्राएलच्या हल्ल्यात शाळेत आश्रय घेतलेले ३० पॅलेस्टिनी ठार, १०० हून अधिक जण जखमी

गाझाच्या मध्यवर्ती भागात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात आज एका शाळेत आश्रय घेतलेले किमान ३० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले तर १०० हून अधिक जण जखमी झाले. मात्र, आपण शाळेच्या आवारात असलेल्या हमासच्या तळावर हल्ला केल्याचं इस्राएलच्या लष्करानं सांगितलं आहे. या शाळेच्या आश्रयानं शस्त्रास्त्रांचा साठा केला जात असून इस्राएलच्या फौजांवर हल्ले चढवले जात असल्याचं इस्राएलच्या लष्करानं म्हटलं आहे.