October 20, 2024 1:40 PM October 20, 2024 1:40 PM

views 10

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केलेल्या मोहिमेमुळे या परिसरात अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवांसारख्या अनेक सुविधा खंडित आहेत. इस्राईलच्या सुरक्षा दलांनी मात्र हमासच्या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संख्या वाढवून सांगितली जात असल्याच...

August 4, 2024 1:58 PM August 4, 2024 1:58 PM

views 10

दहशतवादी गटाकडून इस्राएलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉन मध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटानं काल रात्री इस्राएलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला केला. हिजबुल्लाह गटाला इराणचं पाठबळ असून पॅलेस्टाइनी नागरिकांच्या विरुद्ध इस्राइलनं केलेल्या हल्ल्याला तसंच इस्राइलनं केफर केला आणि देर सिरियान या लेबनीज शहरांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचं हिजबुल्लाह गटाचं म्हणणं आहे. त्याआधी इस्राइलनं काल हिजबुल्लाह गटावर गोळीबार केला होता आणि आपल्या नियंत्रणाखाली असलेला पश्चिमी भाग आणि गाझा मध्ये एका शाळेवर हल्ला केला होता. या...

July 7, 2024 1:45 PM July 7, 2024 1:45 PM

views 11

इस्रायल हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू ,अधिक जण जखमी

इस्रायलनं काल गाझा पट्टीतल्या एका शाळेच्या इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये हजारो विस्थापित लोक राहत होते, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तर या शाळेच्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. इस्त्रायलविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांसाठी मानवी ढाल म्हणून नागरी संरचना आणि लोकसंख्येचे शोषण करून हमासनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोपही इस्रायलनं केला आहे.