April 13, 2025 7:44 PM April 13, 2025 7:44 PM

views 4

गाझामधल्या शेवटच्या कार्यरत रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला

गाझामधलं शेवटचं पूर्णपणे कार्यरत रुग्णालय अल अहली बॅप्टिस्ट रुग्णालयाचा काही भाग इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे.  या रुग्णालयात हमासचे कमांड आणि कंट्रोल केंद्र असल्यामुळे या रुग्णालयावर हल्ला केल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. गाझाच्या नागरी आपत्कालीन सेवेनुसार, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धबंदी कराराचा पहिला सहा आठवड्यांचा टप्पा या वर्षी १ मार्च रोजी संपला. युद्धबंदीवरील चर्चेचा दुसरा टप्पा रखडला आहे. १८ मार्चपासू...

March 23, 2025 11:20 AM March 23, 2025 11:20 AM

views 14

इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल-बर्दावील ठार

गाझामध्ये, खान युनिस इथे इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल-बर्दावील ठार झाले. हमास आणि पॅलेस्टिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, दक्षिण गाझा पट्टीतील बर्दावील इथे हा हल्ला झाला, यामध्ये त्यांच्या पत्नीसह त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, काल सकाळपासून विविध ठिकाणी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात 32 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

September 30, 2024 12:49 PM September 30, 2024 12:49 PM

views 26

इस्रायलीच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबोलाचा अधिकारी नबिल कौक ठार

हिजबोलाचा अधिकारी नबिल कौक हा इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलानं दिली आहे. कौक हा हिजबोलाच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा पथकाचा कमांडर होता.  तो १९८० मध्ये या संघटनेत सामील झाला होता. त्यानंतर त्याला दक्षिणेकडच्या भागातला डेप्युटी कमांडर बनवण्यात आलं होतं. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांमध्ये कौक याचा थेट सहभाग असल्याचं इस्रायल सुरक्षा दलानं म्हटलं आहे.